प्रतिनिधी/ बेळगाव
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे दिवाळीसाठीच्या खरेदीसाठी रविवारी बाजारात मोठी गर्दी दिसून आली. साप्ताहिक सुटी असल्यामुळे नोकरदार ग्राहकांनी बाजारात जावून खरेदी केली. दिवाळीपूर्वीचा हा रविवार असल्याने कपडे, साहित्य खरेदीची रेलचेल सुरू होती.
लॉकडाऊन खुले झाल्यानंतर बाजारपेठेत हळहळू गर्दी होत होती. परंतु खरेदीसाठी रविवारी प्रथमच इतकी गर्दी पाहायला मिळाली. रविवारी सकाळपासूनच ही गर्दी पाहायला मिळाली. कपडे, किराणा बाजार, गृहोपयोगी साहित्य खरेदी मोठय़ा प्रमाणात सुरू होती. यामुळे दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा दिसत होत्या. व्यापारी वर्गातूनही समाधान व्यक्त होत होते. दिवाळीमुळे लाखो रुपयांची उलाढाल शनिवार व रविवार या दोन दिवसांमध्ये झाल्याचे क्यापाऱयांनी सांगितले.
कोरोनाचे भय नाहीच
कोरोनाच्या धास्तीमुळे लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु याची कोणालाच तिळमात्रही तमा नसल्याचे रविवारी बाजारात दिसून आले. त्यामुळे नागरिकांना कोरोनाचे भय राहिलेच नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. बाजारासोबत शॉपिंग मॉल, दुकानांमध्येही सोशल डिस्टन्सिंग न ठेवता गर्दी करण्यात येत होती. मोजक्मयाच जणांकडे मास्क असल्याचे दिसत होते.
वाहतूक पोलिसांची तारांबळ
मारुती गल्ली, गणपत गल्ली, खडेबाजार, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, काकतीवेस या ठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाली होती. जागोजागी लावण्यात आलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. बाजारात येणाऱया ग्राहकांनाही या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता.