प्रतिनिधी बेळगाव
रविवारी राज्यातील 97 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, बेळगावला मात्र दिलासा मिळाला आहे. राज्यातील एकूण बाधिताची संख्या 2056 वर पोहचली आहे.
शनिवारी सायंकाळपासून रविवारी दुपारपर्यंत राज्यातील इस्पितळातून कोरोनामुक्त झालेल्या 26 जणांना घरी पाठविण्यात आले असून आतापर्यंत 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. रविवारी पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये अधिकाधिकजण महाराष्ट्रातून परतलेले आहेत.