25 वर्षांनी अनुभवता येणार निसर्गाचे लोभस नाटय़
प्रतिनिधी/ रत्नागिरी
पृथ्वीवर सध्या सर्वच ठिकाणी कोरोनामय वातावरण आहे. आरोग्यावर परिणाम करणाऱया विषाणूच्या उद्रेकाचा परिणाम आहे. याला रोखण्यासाठी सर्वच देशात प्रयत्न सुरु आहेत. सर्व टिव्ही वाहिन्यांवर सध्या कोरोनाची आकडेवारी शिवाय दुसरं काही विशेष नाही. मात्र येत्या 21 जून रोजी एका अनोख्या खगोलीय घटनेची घटीका आहे. विज्ञानप्रेमींना अभ्यासाचा आणि सर्वांचा कुतुहलाचा विषय या निमित्तानं दिसणार आहे.
भारतात सकाळी सव्वा नऊच्या सुमारास या ग्रहणाला प्रारंभ होईल. दुपारी 2.58 पर्यंत या ग्रहणाचे विविध टप्पे भारतीयांना अनुभवता येणार आहेत. भारतात सर्वत्र हे सूर्यग्रहण दिसणार असले तरी काही ठिकाणी खग्रास तर काही ठिकाणी कंकणाकृती स्वरुपात दिसणार आहे.
सूर्याची आभा झाकली गेल्याने भरदिवसा अंधार अर्थात रात्र झाल्याचा फिल देणारी ही घटना आहे. 1994 नंतर ज्यांचा जन्म झाला अशा सर्वांसाठी हा पहिला ग्रहणानुभ असेल कारण यापूर्वी अशाप्रकारचं ग्रहण 24 ऑक्टोबर 1995 रोजी झालं होतं.
ग्रहण काळात सूर्य किरण वक्री होतात त्यामुळे थेट डोळयांनी ग्रहण बघणे डोळयांसाठी हानीकारक आहे. यासाठी ग्रहणचष्मा सर्वोत्तम उपाय आहे. काळया शिलच्या मदतीने टेलिस्कोप, ऑप्टीकल पॅमेरा किंवा अगदी साधी घरातील चाळणी, झाऱया यांच्या सहाय्याने याची प्रतिमा जमिनीवर किंवा कागदावर घेऊन बघणं असे अनेक पर्याय सांगता येतील.
आसमंताच्या रंगमंचावर हे रंगणारं छाया-प्रकाश नाटय असं या ग्रहणाला म्हणता येईल. चालू शतकातील हे सर्वाधित काळ चालणारं सूर्यग्रहण कंकणाकृती प्रकारातलं आहे. ऑस्ट्रेलिया, आफ्रीका, युरोपचा काही भाग यासह भारतातही काही ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे. अर्थात मान्सूनने आभाळात ढंगाची दाटी असल्यास सर्व खगोलप्रेमींची निराशा होण्याचीही शक्यता दाट आहे.
कंकणाकृती ग्रहण म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये चंद्र आल्यावर चंद्रामुळे सूर्याचा जवळपास सर्व भाग झाकला जातो आणि केवळ बांगडीच्या आकराची अर्थात कंकण आकाराची सूर्याची प्रभा कडेने डोकावताना दिसते. सुर्याला येणारी ही स्थिती खूप मोहक दृश्य निर्माण करणारी असते.
हे ग्रहण आफ्रिकेतील कांगोमध्ये सर्वप्रथम दिसणार आहे. ज्याला स्पर्श बिंदू म्हणतात त्यानंतरचा याचा प्रवास इथिओपिआ, येमेन, सौदी अरेबिया, हिंद महासागर, पाकिस्तान मार्गे भारतात होईल. भारतामध्ये सर्वप्रथम राजस्थानात हे ग्रहण दिसणार आहे. पुढे याचा प्रवास तिबेट, चीनहून प्रशांत महासागरात ते संपेल त्यापूर्वी ऑस्ट्रेलियातून देखील या नाटय़ाचा शेवटचा अंक बघता येईल.
शतकातल्या या ग्रहणाच्या निमित्तानं आकाशात रंगणार हे नाटय सर्वांना एक पर्वणीच ठरणार आहे. अंशत: लॉकडाऊनमध्ये मन आणि बुध्दीलाही खाद्य देणारा हा प्रसंग सर्वच सुरक्षितपणे अनुभवतील.