बेळगाव : येथील रोटरी क्लब ऑफ बेळगाव सेंटर आयोजित रन फॉर उत्सव, रन फॉर होप, रन फॉर बेटर हेल्थ हे ब्रिदवाक्मय घेऊन रविवारी 28 रोजी सीपीएड मैदानावर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी पहाटे 5.30 वा. मॅरेथॉनला प्रारंभ होणार असून, या स्पर्धेत 21 कि.मी., 10 कि.मी., 5 कि.मी. धावणे व 5 कि.मी. फन रन अशा विविध गटात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बेळगावचे पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांच्या हस्ते ध्वज उंचावून होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन स्पर्धा आयोजक रवि भैरवाडगी व अभय शिंदे, मंजुनाथ अलवानी, पवन उप्पीन यांनी केले आहे.