44 जण झाले कोरोनामुक्त
प्रतिनिधी /बेळगाव
रविवारी जिल्हय़ातील 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोरोनावर मात केलेल्या 44 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. गेल्या चार-पाच दिवसांत कोरोनामुळे एकही रुग्ण दगावला नाही. आरोग्य विभागाने स्वॅब तपासणी वाढवली आहे.
जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 200 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 77 हजार 939 जणांनी कोरोनावर मात केली असून अद्याप 374 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मृतांचा सरकारी आकडा 887 इतका आहे.
रविवारी अथणी तालुक्मयात 3, बेळगाव तालुक्मयात 17, बैलहोंगल, हुक्केरी तालुक्मयात प्रत्येकी 1, चिकोडी तालुक्मयात 10 रुग्ण आढळून आले आहेत. गोकाक, खानापूर, रामदुर्ग, रायबाग, सौंदत्ती तालुक्मयात एकही रुग्ण आढळून आला नाही. अद्याप 5 हजार 49 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत.