प्रतिनिधी / सातारा :
रविवार पेठेतल्या स्वातंत्र्यसैनिकनगर कॉलनीत कोरोना बाधित मृत भाजी विक्री करणायाच्या निकट सहवासात आलेले 6 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत.त्या भाजी विक्रेत्याचा दि.1रोजी मृत्यू झाला होता.त्याच्या घरातले पत्नी,आई,दोन मुले ही बाधित झाली आहेत.आता घराशेजारी असलेले सहा जण बाधित झाले आहेत.कोरोनाचे लागलेले ग्रहण स्वतंत्र सैनिकनगरातले सुटणार कधी?, त्यांच्या जे जे संपर्कात आले होते.ते सर्व कोरोन टाइन झाले आहेत,असे सांगितले जाते. मल्हारपेठेतली माहेरवाशीन पनवेलवरून आल्याने कोरोना बाधित झाली आहे.व्यकंटपुरा पेठेत धननीच्या बागे समोरच्या एका अपारमेण्टमध्ये मुंबईहुन आलेली एक वयोवृद्ध महिला कोरोना बाधित आढळून आली आहे.संगमगर येथील रेल्वे पोलिसाची पत्नी कोरोना बाधित आढळून आली आहे.
सातारा शहरात स्वातंत्र्य सैनिकनगरमध्ये गेल्या एक महिन्यांपूर्वी महाबळेश्वरचा एक युवक मुक्कामी राहिला होता.नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्या युवकास लगेच जिल्हा रुग्णालयात तपासणीला पाठवले होते.तो पॉझिटिव्ह आला होता.त्यामुळे कंटेंटमेंट झोन 14 दिवस करण्यात आला होता.14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिथिल करण्यात आल्यानंतर तेथील राहणारे भाजी विक्री करणारे 39 वर्षाचे विक्रेते हे आपल्या पत्नीच्या उपचारासाठी दि.26रोजी कोल्हापूरला गेले होते.तेथून आल्यानंतर त्यांना त्रास जाणवू लागला.दि.29रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता तर दि.1 रोजी मृत्यू झाला.त्यांच्या संपर्कात आलेली त्यांची पत्नी, आई, दोन मुले यांना संस्थात्मक कोरोन टाइन करण्यात आले होते. त्यांचे ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आता त्यांच्या घरालगत राहणाया सहा जणांना बाधा झाली आहे.त्यामध्ये अडीच वर्षाची अडीच व चार वर्षाच्या दोघी सख्या बहिणी, आई, वडील, आजी आणि चुलता असे बाधित आढळून आले आहेत.ते ही त्यांच्या कुटूंबातले आहेत असे समजते. त्यामुळे रविवार पेठेतल्या स्वातंत्र्य सैनिक नगरात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे.आता ते बाधित कोणाच्या संपर्कात आले याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
रविवार पेठेत याची मात्र काहीच माहिती नाही
रविवार पेठ मोठी पेठ आहे.अनेक कॉलन्या, अनेक गल्या आहेत.समर्थ भाजी मंडईलगतच्या स्वतंत्र सैनिक कॉलनीत हे बाधित आढळून येत असल्याने बाकी रविवार पेठेत चिंता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, ते मृत बाधित भाजी विक्रेते यांनी काही दिवस आपले मंडईतले आडत गाळा सुरू ठेवला असल्याची चर्चा असून त्यामुळे अजून व्यापारी भयभीत आहेत.
मल्हार पेठेतील महिला बाधित
तर मल्हार पेठेत राहणारी माहेरवाशीन गेल्या दोन दिवसांपूर्वी पनवेल येथून आली होती.तिला संस्थात्मक विलीनीकरण कक्षात ठेवले होते.असे सांगितले जात आहे.व्यकंटपुरा पेठेत मुंबईहुन एक कुटूंब गेल्या आठवडय़ात आले आहे.स्थानिक कोरोना दक्षता कमिटीने चौकशी केली असता त्या कमिटीला नाही म्हणून सांगितले होते परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांच्यातील वयोवृद्ध महिलेला त्रास जाणवू लागला तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच संगमनगर येथील राहणारा कोरोना बाधित रेल्वे पोलिसाला कोरोनाची बाधा झाली आहे.सैदापुर येथील बाधित युवकाच्या आईला कोरोनाची बाधा झाली आहे.चोरगेवाडीतल्या युवकाला ही बाधा झाली आहे.दरम्यान शहरात दोन नवीन मायक्रो कंटेंटमेंट झोन पडले आहेत.