नगरसेवक सुनील काळेकर यांचा पाठपुरावा सुरु : मुख्याधिकारी अभिजीत बापट यांचे सहकार्य
प्रतिनिधी /सातारा
सातारा शहर कचराकुंडी मुक्त शहर आहे. शहरात कुठेही कचरा कुंडी दिसणार नाही. परंतु जेथे पुर्वी कचरा कुंडी होती तेथेच कचऱयाचे ढिगच्या ढिग पहायला मिळतात. असेच एक ठिकाण रविवार पेठेत असून तेथे दररोज पडत असलेल्या कचऱयाच्या ढिगामुळे परिसरातील व्यापारी त्रासलेले आहेत. त्यामुळे येथील कचऱयाच्या जागी पाणपोई करण्यासाठी नगरसेवक सुनील काळेकर यांनी पाठपुरावला सुरु केला आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही त्यास ग्रीन सिग्नल दाखवला असून येत्या काही दिवसात रविवार पेठेतल्या त्या जागेत क्लिन क्लिन असे चित्र दिसणार आहे.
रविवार पेठेमध्ये रस्त्यावर तीन ते चार ठिकाणी पूर्वी कचरा कुंडय़ा असायच्या. तात्कालिन आरोग्य सभापती रवींद्र झुटींग यांच्या कार्यकाळात सर्वच कचराकुंडय़ा हटवण्यात आल्या. घरोघरी जावून कचरा गोळा करण्याची प्रक्रिया सुरु झाली. तरीही जेथे कचरा कुंडय़ा होत्या. तेथेच कचरा टाकण्याची प्रथा काही थांबली नाही. रविवार पेठेत रस्त्यालगतच कचरा पडण्याचे अजून सुरुच आहे. दारासमोर येणाऱया घंटागाडीत कचरा टाकण्याऐवजी कचरा साठवून रात्रीचा त्या जागेवर टाकला जातो. त्यामुळे अस्वच्छता व दुर्गधीचा सामना नजिकच्या नागरिकांना व्यापाऱयांना सहन करावा लागतो. पालिका नित्यनियमाने टाकलेला कचरा ट्रकटरमधून भरुन नेण्याचे काम करते. परंतु पालिकेच्या माध्यमातून होत असलेले हे काम थांबून तो परिसर कायमचा कचरामुक्त होण्यासाठी तेथे नगरसेवक सुनील काळेकर यांच्या माध्यमातून त्या जागेवर पाणीपोई किंवा वाचनालय तयार करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी त्यास ग्रीन सिग्नल दिला असून तेथे प्रस्तावित पाणपोई किंवा वाचनालय करण्याकरता बांधकाम विभागाकडून इस्टीमेट व प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती नगरसेवक सुनील काळेकर यांनी दिली. त्यामुळे रविवार पेठेतला तो परिसर क्लिन क्लिन होणार आहे.
मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यामुळेच लागणार काम मार्गी
मुख्याधिकारी अभिजित बापट हे शहरातील चांगल्या कामाला सदैव तत्परतेने काम करताना दिसत असतात. त्यांनी आताही रविवार पेठेतील नगरसेवक सुनील काळेकर यांच्या मागणीनुसार व सततच्या पाठपुराव्यानुसार मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या सहकार्यामुळे हे काम मार्गी लागत आहे.