वार्ताहर /पालये
पवनवाडा-केरी, पेडणे येथील रवींद्रनाथ राधाकृष्ण जोशी (वय 73) यांचे मंगळवार 13 रोजी दुपारी 2.37 वाजता निधन झाले. त्याचदिवशी त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेजमध्ये ते यूडीसी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. पुरोहित म्हणूनही ते परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी उषा, पुत्र यतीश, स्नुषा स्नेहल, कन्या नम्रता नारायण अभ्यंकर, उत्कर्षा विराज केरीकर तसेच नातवंडे असा परिवार आहे.