प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील प्रशासकीय कामकाजाला गती देण्यासाठी सरकारने बुधवारी बेंगळूर ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुख रवी डी. चेन्नण्णावर यांच्यासह 12 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. रवी चेन्नण्णावर यांची सीआयडीच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली.
किनारपट्टी सुरक्षा विभागाचे प्रमुख आर. चेतन यांची म्हैसूर जिल्हा पोलीस प्रमुखपदी तर कोलार जिल्हा पोलीस प्रमुख कार्तिक रेड्डी यांची बदली झाली आहे. तर या पदावरील सी. बी. रिष्यंत यांची दावणगेरे जिल्हय़ात बदली करण्यात आली आहे. बेंगळूरच्या वायरलेस विभागाच्या प्रमुखपदी बदली करण्यात आली आहे. सीआयडीचे एस. पी. राहुलकुमार शहापूरवाड यांची तुमकूर जिल्हा पोलीस प्रमुखपदी तर दावणगेरे जिल्हा पोलीसप्रमुख हनुमंतराय यांची हावेरी जिल्हय़ात बदली करण्यात आली आहे.
म्हैसूरच्या कायदा-सुव्यवस्था विभागाचे डीसीपी डॉ. प्रकाशगौडा यांची बेंगळूरच्या अंतर्गत सुरक्षा विभागात तसेच हावेरी जिल्हा पोलीस प्रमुख के. जी. देवराजू यांची बेंगळूरच्या सीआयडीच्या प्रमुखपदी बदली झाली आहे. गुलबर्गा जिल्हय़ाचे डीसीपी देक्ककिशोर बाबू यांची कोलार जिल्हा पोलीस प्रमुखपदी तर तुमकूर जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. कोना वंशी कृष्णा यांची बेंगळूर ग्रामीण जिल्हा पोलीस प्रमुखपदी बदली झाली आहे.