कोविड रूग्णांनी हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
प्रतिनिधी / फोंडा
राज्यभरात कोरोनाबाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत असताना उपजिल्हा ईस्पितळातील रूग्णवाहिका कमी पडू लागल्या आहेत. कोरोना रूग्णांसह इतर आपत्कालीन सेवेत फोंडा तालुक्यातील जनतेचे हाल होऊ नये यासाठी आमदार रवी नाईक यांनी प्रभावी पाऊल उचलताना ऑक्सिजन जोडणीयुक्त दोन नवीन रूग्णवाहिका रवी सिताराम नाईक चेरीटेबल ट्रस्टला सुपुर्द केल्या आहे. सदर रूग्णवाहिका फोंडा तालुक्यातील जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध राहणार असल्याची माहिती आमदार रवी नाईक यांनी दिली.
आमदार रवी नाईक यांनी स्वखर्चाने दिलेल्या दोन्ही रूग्णवाहिकांच्या चाव्या रवी सिताराम चेरीटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱयाना सुपुर्द करण्यात आल्या. खडपाबांध येथे झालेल्या कार्यक्रमात यावेळी फोंडा पालीकेचे नगरसेवक रितेश नाईक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दोन रूग्णवाहिकापैकी एक रूग्णवाहिका कायमस्वरूपी कोविड रूग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार असून दुसरी इतर आपत्कालीन सेवेतील रूग्णांसाठी उपलब्ध राहणार आहे. ऑक्सिजनाच्या हाताळणीसाठी उपजिल्हा इस्पितळातील एका पारिचारिकेची सोय करण्याविषयी आरोग्य अधिकाऱयांशी बोलणी झाल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.
रूग्ण्वाहिका पुरविण्याचे काम सन 1998 सालापासून-रवी नाईक
यावेळी बोलताना आमदार रवी नाईक म्हणाले की सन 1998 साली उत्तर गोवा खासदारीच्या कार्यकाळात एमपीएलईडी फंडातून उत्तर गोव्यात एकूण 38 रूग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या होत्या त्यात शववाहिकेचाही समावेश होता. आपत्कालीन रूग्णांसाठी त्यावेळी त्या अंत्यत उपयुक्त ठरल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या सरकारने त्या रूग्णवाहिकांचे डागडुजी व्यवस्थितपणे करण्यात आली नसल्याचे बंद पडल्याचे त्यांनी सांगितले. रूग्णवाहिकांची निकड गरज त्याकाळी जाणलेली होती, नवख्या समाजसेवकांनी आपल्याला शहाणपणाचे बोल शिकवू नये असा ईशाराही त्यांनी आपल्या मिष्किल शैलीत दिला.
फोंडा तालुक्यात सात रूग्ण्वाहिकांसाठी हेल्पलाईन
अनेक रूग्णांना रूग्णालयापर्यंत जाण्यासाठी वेळेवर रूग्णवाहिका मिळत नव्हती, त्यात भर लक्षणे असलेल्यासाठी चाचणी करण्यासाठी सहसा कोणी पुढे सरसावत नाही. त्य़ामुळे रूग्णवाहिकांचा उपयुक्त ठरणार आहे. फोंडा शहरात एकूण सात रूग्णवाहिका कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. यौपकी मगो पक्षाच्या दोन, फेंडा फर्स्ट राजेश वेरेकर यांच्या दोन, रवी नाईक यांच्या ऑक्सिजनयुक्त दोन, तसेच फोंडा पालीकेची एक रूग्णवाहिका फोंडा उपजिल्हा इस्पितळात सेवा बजावत आहे. कोरोना संशयित रूग्ण गृहविलगीकरणातील कुणाची प्रकृती बिघडली, तर तात्काळा आपल्या भागातील हेल्पलाईनला संपर्क साधावा. फोंडा फर्स्ट रूग्ण्वाहिकेसाठी 91-9175944773, रवी चेरीटेबल ट्रस्टच्या ऑक्सिजनयुक्त रूग्ण्वाहिकेसाठी हेल्पलाईन-7262921415, 8830767550, 7972501163 तसेच मगो पक्षाच्या रूग्णवाहिकेसाठी 9158999363 व 8010455033 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालीकेची रूग्णवाहिका उपजिल्हा इस्पितळात चोवीस तास सेवा बजावत आहे.