ऑनलाईन टिम : नवी दिल्ली
भारत सरकारचा रशियाकडून कोकिंग कोळसा आयात सुरू ठेवण्याकडे कल आहे असे मत पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग रविवारी सांगितले. ही आयात दुप्पट करण्यासाठी योजना असून युक्रेनवरील आक्रमणामुळे रशियावर बहिष्कार टाकण्याच्या जागतिक शक्तींचा विरोधातील हा निर्णय ठरू शकतो.
मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग यांनी नवी दिल्लीतील एका परिषदेत सांगितले की,कोकिंग कोळसा जो पोलाद बनवण्याचा प्रमुख घटक आहे. आम्ही रशियाकडून आयात करण्याच्या दिशेने नवीन वाटचाल करत असून रशियन कोकिंग कोळशाची आयात दुप्पट करण्याची भारताची योजना आहे. ते म्हणाले की, देशाने 45 लाख टन कोकींग कोळसा आयात केला आहे.
पाश्चात्य देश आणि जपानने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सरकारवर आणि त्यांच्याशी संबंधित लोकांवर अनपेक्षितपणे जोरदार निर्बंध लादले आहेत. वस्तूंपासून शस्त्रास्त्रांपर्यंत रशियन वस्तूंचा प्रमुख खरेदीदार असलेला भारत, 24 फेब्रुवारीच्या आक्रमणाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या अनेक महत्त्वाच्या मतांपासून दूर राहिला होता.
युद्धामुळे कोकिंग कोळशाच्या रशियाकडून होणाऱ्या “सुरळीत पुरवठ्यावर” परिणाम झाला आहे, असे सिंग म्हणाले. कमीत कमी 10.6 लाख टन कोकिंग कोळसा वाहून नेणारी जहाजे, मुख्यत्वे पोलादनिर्मितीसाठी वापरली जाणारी, आणि प्रामुख्याने वीज निर्मितीसाठी वापरला जाणारा थर्मल कोळसा, या महिन्यात भारतीय बंदरांना इंधन वितरीत करण्यासाठी सज्ज असतील. रशिया हा भारतातील कोकिंग आणि थर्मल कोळशाचा सहावा सर्वात मोठा पुरवठादार आहे तसेच रूबल-रुपया ट्रेडिंगद्वारे व्यापाराला चालना मिळू शकते, असे पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग म्हणाले.