वृत्तसंस्था/ मॉस्को
23 जुलैपासून सुरू होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून नौकानयन क्रीडा प्रकारात पुरूषांच्या क्वॉड्रूपल स्कल्स संघाने माघार घेतल्याची घोषणा रशियाच्या नौकानयन फेडरेशनने रविवारी केली. आता या क्रीडा प्रकारात लिथुआनियाला संधी मिळाली आहे.
नौकानयन प्रकारातील पुरूषांच्या क्वॉड्रूपल स्कल्स संघातील दोन बदली नौकायनपटूंचा दर्जा ऑलिंपिक स्पर्धेला साजेसा नसल्याने रशियाच्या पुरूष संघाने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता रशियाच्या जागी लिथुआनियाला संधी देण्यात आली असून विश्व नौकानयन फेडरेशनच्या नियंत्रण मंडळाने लिथुआनियाच्या नौकानयन फेडरेशनशी संपर्क साधला आहे.