युटय़ूबने रशियन संसदेच्या चॅनेलचे अकौंट ब्लॉक केले आहे. डय़ुमा-टीव्हीचे 1 लाख 45 हजारांहून अधिक सब्सक्राइबर आहेत. ही वाहिनी संसदीय चर्चा आणि रशियन खासदारांच्या मुलाखतींचे प्रसारण करत असते.
युटय़ूब चॅनेलवर झालेल्या कारवाईनंतर रशियाने प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिका ‘रशियाच्या अधिकारां’चे उल्लंघन करत असल्याचे विधान डय़ुमाचे प्रमुख व्याचेस्लाव्ह वोलोडिन यांनी केले आहे. अमेरिका माहितीच्या प्रसारावर एकाधिकार ठेवू पाहत असला तरीही आम्ही याची अनुमती देऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिकेची दिग्गज इंटरनेट कंपनी गुगलच्या जाहिरातींवर रशियाकडून बंदी घालण्यात आली आहे. तर रशियाच्या यंत्रणेने युटय़ूबवर रशियाच्या सैन्य मोहिमेविषयी बनावट वृत्त फैलावण्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे युटय़ूबवर गुगलचीच मालकी आहे.