वृत्तसंस्था/ मॉस्को
आगामी युरो चषक फुटबॉल स्पर्धेपूर्वी येथे आयोजित केलेल्या मित्रत्वाच्या सरावाच्या सामन्यात शनिवारी यजमान रशियाने बल्गेरियाचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. युरो चषक फुटबॉल स्पर्धेला येत्या शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.
या शेवटच्या सरावाच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. दरम्यान 84 व्या मिनिटाला बदली खेळाडू ऍलेक्सांडर सोबोलेव्हने पेनल्टीवर रशियाचा एकमेव निर्णायक गोल केला. या सामन्यावर रशियाचे बल्गेरियाच्या तुलनेत अधिक वर्चस्व दिसत होते. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत रशियाचा सलामीचा सामना सेंट पीटर्सबर्ग येथे 12 जून रोजी बेल्जियम बरोबर होणार आहे. रशियाचा ब गटात समावेश असून या गटात डेन्मार्क आणि फिनलँड यांचाही समावेश आहे.