40 सैनिकांची केली होती हत्या
युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या एका महिला स्नायपरला युद्धग्रस्त डोनबास क्षेत्रातून अटक केली आहे. या रशियन स्नायपरने युक्रेनच्या 40 लोकांची गोळय़ा झाडून हत्या केली होती. युद्धादरम्यान जखमी झाल्यावर रशियाच्या सैन्याने या महिला स्नायपरला वाऱयावर सोडून दिले होते. या रशियन महिला स्नायपरचे नाव इरीना स्टारिकोव्हा असून तिचे कॉल साइन बगिरा आहे. इरिना 2014 पासून रशिया पुरस्कृत फुटिरवादीक्षेत्र डोनेट्स्कच्या बंडखोरांसोबत मिळून युक्रेनच्या विरोधात लढत होती.
लढाईत जखमी झाल्यावर रशियाच्या सैन्याने तिला मरण्यासाठी सोडून दिले होत. इरिना स्टारिकोव्हाच्या अटकेची माहिती युक्रेनियन आर्म्ड फोर्सेसने फेसबुकवर दिली आहे. इरिनाने आतापर्यंत 40 हून अधिक युक्रेनियन नागरिकांना स्वतःच्या स्नायपर रायफलने लक्ष्य केले होते. इरिनाच्या अटकेची पुष्टी किंग्स कॉलेज लंडनमध्ये युद्ध अध्ययन विभागाचे संशोधक जियोर्गी रेविशविली यांनीही दिली आहे.
युक्रेनच्या सुरक्षा दलांनी ओआरडीएलओकडून लढत असलेल्या कुख्यात स्नायपरला पकडले आहे. ही महिला स्नायपर युक्रेनच्या फुटिरवाद्यांच्या बाजूने लढत होती. इरिना स्टारिकोव्हा मूळची सर्बियाची रहिवासी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ताब्यात घेण्यात आले तेव्हा स्टारिकोव्हा गंभीर जखमी झाली होती. तिला त्वरित वैद्यकीय मदत पुरविण्यात आल्याचे युक्रेनच्या सैन्याकडून सांगण्यात आले. इरिना ही 11 व्या स्पेशलाइज्ड स्पेशल ऑपरेन्शन डिव्हिजनमध्ये स्नायपर म्हणून कार्यरत होती.