युक्रेनचे युद्ध चेचन्याच्या लढाईपेक्षाही अवघड
काही दिवसांमध्ये युक्रेनवर विजय मिळविण्याचा विचार करणाऱया रशियाला महिन्याभरापासून निकराच्या प्रतिकारामुळे पिछेहाट सहन करावी लागलत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांपैकी एक रशियाच्या सैन्याच्या विरोधात युक्रेनने कडवी झुंज दिली आहे. पूर्ण शक्तिनिशी हल्ल्यानंतरही रशियाला आतापर्यंत युक्रेनची राजधानी कीव्हवर कब्जा करता आलेला नाही. यामुळे रशियाच्या सैनिकांचे मनोबल खालावत चालले असून ते हताश होऊ लागले आहेत. रशियाच्या दोन सैन्य कमांडरांचे संभाषण समोर आले आहे. यात ते युक्रेनसोबतचे युद्ध ‘चेचन्याच्या लढाई’पेक्षाही अधिक अवघड असल्याचे म्हणत आहेत. रशियन सैन्य कमांडरांचे सॅटेलाइट रेडिओ-सॅटवर झालेले संभाषण समोर आले आहे. काळय़ा समुद्रानजकी युक्रेनचे शहर मीकोलाइव्हच्या आघाडीवर तैनात एक रशियन सैन्याधिकारी आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱयामधील संभाषण उघड झाले आहे. या संभाषणात युक्रेनमधील युद्धाची वस्तुस्थिती ‘चेचन्याच्या लढाई’पेक्षाही बिकट असल्याचे म्हटले गेले. ‘जीव गमाविणाऱया रशियाच्या सैनिकांचे मृतदेह देखील मिळविता येत नाहीत’ असे या अधिकाऱयाने संभाषणादरम्यान म्हटले होते. त्यांचे हे संभाषण रशियन भाषेत आहे. दिमित्री एल्परोविच यांनी हे संभाषण सार्वजनिक केले आहे. दिमित्री हे मूळचे रशियन असून सध्या अमेरिकेत राहत आहेत.