युक्रेनला जर्मनीकडून हजारो क्षेपणास्त्रे प्राप्त
किव्ह / वृत्तसंस्था
रशिया- युक्रेन युद्ध महिन्यानंतरही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी उत्तर अटलांटिक महासागरात आण्विक पाणबुडय़ा तैनात केल्याने युद्ध आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. रशियन पाणबुडय़ा 16 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास सक्षम आहेत. एकीकडे पुतिन यांनी अण्वस्त्र प्रतिबंधक दलांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे, जर्मनीकडून 1,500 स्ट्रेला विमानविरोधी क्षेपणास्त्रे आणि 100 एमजी-3 मशीन गनचा पुरवठा झाल्याने युक्रेनचे बळ वाढले आहे.
युपेनमधील विशेष लष्करी कारवाईचा पहिला टप्पा संपला आहे. रशियन सैन्य आता पूर्व डॉनबास प्रदेशाच्या स्वातंत्र्यावर लक्ष केंद्रित करत असून येथे रशियन-समर्थित फुटीरतावादी आठ वर्षांपासून लढत आहेत. युपेनियन सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता लक्षणीयरीत्या कमी झाल्यामुळे आम्ही आता डॉनबासवर लक्ष केंद्रित करू शकतो, असे रशियन सैन्याच्या जनरल स्टाफचे वरि÷ प्रतिनिधी सर्गेई रुडस्कोई यांनी सांगितले. रशियाने युद्धाच्या सुरुवातीला डॉनबासच्या डोनेस्?क आणि लुहान्स्?क या दोन भागांना स्?वतंत्र प्रदेशाची मान्यता दिली आहे.
रशिया डॉनबास प्रदेशातील आक्रमणाला पाठिंबा देण्यासाठी जॉर्जियामार्गे युपेनमध्ये सैन्य पाठवत असल्याचा दावा अमेरिकेच्या एका वरि÷ संरक्षण अधिकाऱयाने केला आहे. आम्ही शुक्रवारी जॉर्जियाहून काही सैन्याच्या हालचाली पाहिल्या. मात्र, सैनिकांची नेमकी संख्या आमच्याकडे नाही, असे पेंटागॉनच्या अधिकाऱयाने शनिवारी स्पष्ट केले.
लोकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरूच
युपेनमध्ये अडकलेल्या लोकांना मानवी कॉरिडॉरमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मारियुपोलमधील लोकांना बाहेर काढण्यासाठी तुर्की आणि ग्रीस या देशांची मदत घेतली जात आहे. मारियुपोलमधील 2,800 लोकांना झापोरिझिया येथे हलवण्यात आले आहे. याचदरम्यान 4,000 मारिओपोल लोकांना रस्तेमार्गाने बसच्या माध्यमातून अन्यत्र नेण्यात आले. तसेच 531 लोकांना मेलिटोपोलहून झापोरिझियाला नेण्यात आले आहे.