ऑनलाईन टीम / मॉस्को :
देशात नागरिकांना आता रशियाची ‘स्पुतनिक-व्ही’ लसही दिली जाणार आहे. पुढील आठवड्यापासून ही लस बाजारात उपलब्ध होणार असून, या लसीच्या डोसची किंमत 995.40 रुपये असणार आहे.
भारतात सध्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोवॅक्सिन’चे लसीकरण सुरू आहे. ‘स्पुतनिक-व्ही’ ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. रशियातून आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. मात्र, यापुढे या लसीचे उत्पादन डॉ. रेड्डीज ही औषधनिर्माता कंपनी भारतात करणार आहे. त्यामुळे भविष्यात या लसीची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये ‘स्पुतनिक-व्ही’चा पहिला डोस दिला आहे.