26 हजार रुपयांपर्यंत विकले गेले बिग मॅक्स पॅक
अखेरचा बर्गर खाण्यासाठी रस्यांवर लागली मोठी रांग
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे रशियावर अनेक पाश्चिमात्य देशांनी निर्बंध लादले आहेत. 13 मार्च रोजी मॅकडोनाल्ड्सने रशियातील स्वतःची सर्व 850 रेस्टॉरंट्स बंद केली आहेत. यापूर्वी अखेरचा बर्गर खाण्यासाठी रशियन लोकांची गर्दी मॅकडोनाल्ड्समध्ये दिसून आली. आता सोशल मीडियावर अखेरच्या बर्गरचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
रशियाने युक्रेनवरील हल्ला सुरूच ठेवल्याने कंपनीच्या रशियातील युनिट्स बंद करणेच योग्य असल्याचे उद्गार मॅकडोनाल्ड्सचे सीईओ क्रिस केम्पकिंस्की यांनी मागील आठवडय़ात काढले होते. यापूर्वी आंतरराष्ट्रीय फूड चेन स्टार बक्स, कोका कोला, पेप्सिको, केएफसी, बर्गर किंगने देखील रशियातील स्वतःच्या शाखा बंद केल्या आहेत. याचबरोबर एक्सॉन-मोबिल, जनरल इलेक्ट्रिक, नेटफ्लिक्ससह अनेक कंपन्यांनी रशियातील स्वतःचे कामकाज बंद पेले आहे.
रशियात बंद झालेले इंटरनॅशनल फूड चेन स्टोअर
स्टार बक्स 130
बर्गर किंग 800
केएफसी 70
पिझ्झा हट 50
वेतन देत राहणार मॅकडोनाल्ड्स
फास्ट फूड चेन मॅकडोनाल्ड्सने रशियातील स्वतःच्या सर्व शाखा बंद केल्या असल्या तरीही कंपनी स्वतःच्या 62,000 कर्मचाऱयांना वेतन देत राहणार आहे. परंतु लोक कंपनीच्या निर्णयाला विरोध करत आहेत. पियानोवादक लुकास सफ्रोनोव्ह यांनी मॅकडोनाल्ड्सच्या बंदीला विरोध करण्यासाठी मॉस्कोच्या पुश्किन स्क्वेअरमध्ये अनोख्या प्रकारे निदर्शन केले आहे.
1990 मध्ये झाली होती एंट्री
31 जानेवारी 1990 रोजी गोर्बाचेव्हच्या पेरेस्त्राsइकादरम्यान सोव्हियत संघात पहिल्या मॅकडोनाल्ड्स शॉपचे उद्घाटन झाले होते. त्यादिवशी 30 हजारांहू अधिक लोक फास्ट फूड सेंटरमध्ये पेहोचले होते. या लोकांची नोंद करण्यासाठी 27 रजिस्टरांचा वापर करावा लागला होता. कंपनीसाठी हे विक्रमी ओपनिंग होते. स्टोअरबाहेर 5 हजार लोक रांगेत उभे होते. अमेरिकेच्या नेटवर्कचा प्रवेश हा सोव्हियत संघाच्या पतनाचे प्रतीक होते.