ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात कोरोनाबाधितांची संख्या आठ लाखांवर गेली आहे. मागील 24 तासात रशियात कोरोनाचे 5848 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 147 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियात आतापर्यंत 8 लाख 849 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 13 हजार 046 जणांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
आठ लाख कोरोनाबाधितांपैकी 5 लाख 88 हजार 774 जण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 1 लाख 99 हजार 038 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 2300 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
कोरोना संक्रमणाच्या बाबतीत रशिया जगात चौथ्या स्थानावर आहे. रशियात आतापर्यंत 2 कोटी 63 लाख 652 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. मात्र, या आकडेवारीच्या विश्वासार्हतेविषयी शंका व्यक्त होत आहे.