ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात कोरोनावरील उपचारासाठी तयार करण्यात आलेल्या ‘कोरोनावीर’ या अँटिव्हायरल औषधाच्या वापरला परवानगी देण्यात आली आहे.
रशियातील ‘आर-फार्म’ या फार्मा कंपनीने कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी अँटिव्हायरल औषध तयार केले आहे. हे रशियातील पहिले औषध असून, या औषधाला ‘कोरोनावीर’ असे नाव देण्यात आले आहे. कोरोनावीर हे औषध कोरोना लक्षणाला केंद्रीत नसून ते थेट आजारालाच लक्ष्य बनवते, असा कंपनीचा दावा आहे.
या औषधाची क्लिनिकल चाचणी घेण्यात आली. हे औषध घेणाऱ्या 55 टक्के अधिक सुधारणा झाली. पाचव्या दिवशी 77.5 टक्के रुग्णांमध्ये विषाणू आढळला नाही. हे औषध रुग्णाच्या शरीरात विषाणूची संख्या वाढण्यापासून अटकाव निर्माण करते. त्याच्या क्लिनिकल चाचणीनंतर त्याला रुग्णांवरील उपचारासाठी मंजुरी देण्यात आली आहे. आर-फार्मचे वैद्यकीय संचालक डॉ. मिखाईल सोमसोनोव यांनी याबाबतची माहिती दिली.