ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात आतापर्यंत 44 लाख 045 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 92 हजार 494 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
सोमवारी या देशात 9 हजार 437 कोरोना रुग्ण आढळून आले. तर 404 जणांचा मृत्यू झाला. 44 लाख रुग्णसंख्येपैकी 40 लाख 03 हजार 576 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 3 लाख 03 हजार 975 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 2300 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. येथे आतापर्यंत 11 कोटी 55 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, जगात कोरोना संक्रमणाचा वेग अमेरिकेत सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 3 कोटी 01 लाख 38 हजार 586 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 5 लाख 48 हजार 013 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा दुसरा तर भारताचा तिसरा क्रमांक लागतो.