सलमान अन् कैफ लवकरच रवाना होणार
सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘एक था टायगर’ प्रँचाइजीच्या पुढील चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होणार आहे. टायगर 3 साठी सलमान आणि कॅटरिना स्वतःच्या टीमसह रशियाला रवाना होतील.
यशराज फिल्म्स, सलमान, कॅटरिना, दिग्दर्शक मनीष शर्मा याच्यासह कलाकारांची पूर्ण टीम तसेच चित्रिकरणाचे पथक रशियाला जाणार आहे. टीम टायकर 18 ऑगस्ट रोजी रवाना होईल. चित्रिकरणाची तयारी मागील कित्येक महिन्यांपासून केली जात आहे.
रशियासोबतच चित्रिकरण अन्य आंतरराष्ट्रीय ठिकाणी पार पडणार आहे. सलमान आणि कॅटरिना प्रथम रशियात चित्रिकरण करतील आणि नंतर तुर्कस्तान-ऑस्ट्रिया यासारख्या ठिकाणी चित्रिकरण होणार आहे. महामारीच्या काळात सुरक्षेबाबत कुठलीच तडजोड करण्याची निर्माते तसेच दिग्दर्शकांची तयारी नाही. याचमुळे चित्रिकरणाकरता व्यापक नियोजन करण्यात आले आहे.
एक था टायगरचा हा तिसरा भाग असणार आहे. या चित्रपटात सलमान आणि कॅटरिनासाब्त इम्रान हाश्मी देखील असणार आहे. इम्रान खलनायकाच्या भूमिकेत असेल.