युक्रेनचा मोठा दावा ः
युक्रेन आणि रशियाच्या युद्धाचा रविवार चौथा दिवस होता. सातत्याने होत असलेले हल्ले आणि बॉम्बवर्षावामुळे या युद्धाची सुरुवात झाली, ज्यात आतापर्यंत मोठय़ा प्रमाणावर जीवित-आर्थिक हानी झाली आहे. रशिया वेगाने युक्रेनवर हल्ले करत आहे, तर युक्रेनने देखील आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. युद्धमैदानात दोन्ही देशांदरम्यान हल्ले थांबण्याची चिन्हे नाहीत.
रशियाने 24 फेब्रुवारीपासून आतापर्यंत 14 विमाने, 8 हेलिकॉप्टर्स, 102 रणगाडे, 536 बीबीएम, 15 मशीनगन्स आणि 1 बीयूके क्षेपणास्त्रs गमाविली आहेत. तसेच रशियाने 3,500 हून अधिक सैनिकांनाही गमावले आहे. सुमारे 200 सैनिकांना युक्रेनने पकडले आहे.
रशियाने युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या क्षेत्रांमध्ये विशेष दलांना पुन्हा तैनात करण्यास सुरू केले आहे. हवाईक्षेत्र, सैन्यडेपो आणि नागरिकांवर हवाई हल्ले करणे सुरूच ठेवले आहे. हवाईहल्ल्यांमध्ये सुमी, पोल्टावा, मारियुपोल आणि कीव्हला लक्ष्य करण्यात आले. रशियाने काळय़ा समुद्रावरून पूर्ण युक्रेनमध्ये नौदल आधारित क्रूज क्षेपणास्त्रs डागली. रशियाच्या आक्रमणाला युक्रेनच्या सैन्याने खार्किव्ह ओब्लास्टमध्ये रोखले आहे. सुमी ओब्लास्टच्या ओख्तिरकामध्ये शहरी युद्ध अद्याप लढले जातेय.