ऑनलाईन टीम / तरुण भारत
24 फेब्रुवारी पासुन युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरु असुन यामुळे युक्रेनमध्ये अऩेक देशातील नागरिक, विद्यार्थी अडकले आहेत. यामुळे जगातील अनेक देश चिंतेत आहेत. आजपर्यंत या युध्दात क्षेपणास्त्राचा वापर झाला असुन अण्विक शस्त्रांच्या हल्ल्याच्या धमक्याही आता दिल्या जात आहेत. युक्रेनला नामोहरम करण्यासाठी रशिया अहोरात्र प्रयत्न करत आहे. यातुन रशियावर अनेक देश दबाव टाकत निर्बंध लादत आहेत. याच पार्श्वभुमीवर असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार पुतिन यांनी शनिवारी मॉस्कोजवळ फ्लाइट अटेंडंटच्या एका गटाला सांगितले की, “हे जे निर्बंध लादले जात आहेत, ते युद्ध घोषित करण्यासारखे आहेत.”
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर अनेक पाश्चात्य देशांनी या युद्धाला विरोध करत रशियावर निर्बंध लादणे सुरु केले आहे. परंतु रशियाने युक्रेनवर हल्ले सुरूच ठेवले. दरम्यान रशियावर घातलेल्या निर्बंधांवर प्रतिक्रिया देत रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी इशारा दिला आहे. पाश्चात्य देशांकडून त्यांच्या देशावर लादण्यात आलेले निर्बंध हे युद्धाच्या घोषणेप्रमाणे आहे, असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले आहेत.
क्रेनमध्ये नो-फ्लाय झोन स्थापित करण्याचा कोणताही प्रयत्न केल्यास त्याचे युरोप आणि जगाला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा पुतिन यांनी दिला आहे. नाटोने नो-फ्लाय झोनची युक्रेनची राजधानी किव्हची विनंती नाकारली आहे. कारण असं केल्यास ते रशियाला मोठे युद्ध करण्यास प्रवृत्त करण्यासारखं होईल, असं मत त्यांनी नोंदवलं. त्यामुळे काही काऴानंतर रशिया आपली भुमिका बदलत संय्यमाने घेईल हे भाकित आता खोट ठरत आहे. तर याचा परिणाम जगाला खरच भोगावा लागणार का ? यामुळे अनेक देश चिंतेत आहेत.