जसजसे रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये घुसले, त्यांची क्षेपणास्त्रे देशभरातील लक्ष्यांवर धडकली, त्याचबरोबर त्यांच्या हॅकर्सनी सायबर हल्ल्यांचा मारा केला. जस जसे रशियन आक्रमण वाढत गेले तसे या दिवसांमध्ये, युक्रेनियन वेबसाइट्स विस्कळीत केल्या गेल्या आणि ऑफलाइन झाल्या आणि सरकारी यंत्रणांवर डेटा-वाइपिंग मालवेअर सोडण्यात आले. मात्र एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की रशियाने केलेला हा हल्ला जरी आजचा असला तरी, सायबर हल्ला हा आश्चर्य करण्यासारखा नव्हता कारण रशियाने मागील काही वर्षांपासून युक्रेनविरुद्ध सायबर शस्त्रे वापरली आहेत. आता मात्र, प्रश्न असा आहे की रशिया आपली सर्व सायबर शस्त्रे अमेरिकेकडे वळवेल का? आणि जर असे झाले तर अमेरिका त्याला कसा प्रतिसाद देईल. अर्थात हा भविष्यातील विषय आहे. मात्र आज तारखेला युक्रेनला अधिक सायबर-हल्ल्यांचा फटका बसला आहे. युक्रेनियन सरकार म्हणते की हे सायबर हल्ले रशियाने ‘पूर्णपणे वेगळय़ा पातळी’चे आहेत.
आज तारखेला रशियाची लष्करी आणि गुप्तचर संस्था अनेक वर्षांपासून सायबर युद्धातील त्यांच्या कौशल्याचा वापर करत आहे आणि जगातील नावजलेले हॅकर्स रशियाकडे आहेत. त्यांनी अनेक राज्यांविरुद्ध (युक्रेन, जॉर्जिया, एस्टोनिया आणि यू.एस.) असंख्य लष्करी सायबर ऑपरेशन्स केल्या आहेत. याचवेळी, ते कोबेअर किंवा फॅन्सीबेअर सारख्या प्रॉक्सी (हॅकर्स) ग्रुपशी संबंध राखून आहेत. फॅन्सीबेअर, हा एक रशियन हॅकर ग्रुप आहे जो रशियाच्या GRU मिलिटरी इंटेलिजन्स एजन्सीशी संबंधित असल्याचे मानले जाते तर कोझीबेअरचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे विविध राष्ट्रे आणि बहुराष्ट्रीय संस्थांची माहिती इंटेलिजन्स इन्फॉर्मेशन गोळा करणे तसेच अधूनमधून नेटवर्क आणि पायाभूत सुविधा नष्ट करणे किंवा व्यत्यय आणणे हे आहे. हे दोन्ही ग्रुप स्वतंत्रपणे काम करत असले तरी ते रशियन सरकारसाठी कार्य करतात असे ठामपणे मानले जाते.
रशियाने सायबर हल्ले कसे केले
रशियन हॅकर्सनी युपेनच्या विविध क्षेत्रावर जसे की ऊर्जा, कम्युनिकेशन आणि शस्त्रे प्रणालींमध्ये मालवेअर आणि बॅकडोअर एम्बेड (जोडणे) केले, ज्यामुळे युपेनला फर्स्ट स्ट्राइक सायबर धोका निर्माण झाला आहे. अशा सायबर स्ट्राइकमध्ये विविध चुकीच्या, फसव्या बाबी व त्याची माहिती असते. ह्याचा परिणाम असा की युपेनियन सैन्य आणि लोकांमध्ये आणखी गोंधळ, संभ्रम निर्माण होईल व आराजकता माजेल. याआधी, म्हणजे जसे युध्द सुरू झाले तसे अनेक युपेनियन बँका आणि सरकारी विभागांच्या वेबसाइटवर रशियाने हल्ले केले. मात्र त्यात रशियाला फारसे यश मिळाले नाही. त्या नंतरच्या दुपारपासून डिडॉस हल्ले होत राहिले. युक्रेनची इंटरनेट कनेक्टिव्हिटी देणाऱया कंपनीने सांगितले की डीडॉस हल्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच ह्या हल्ल्यांची लाट सुरू झाली व ती तीव्र होत गेली. डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हल्ले वेबसाइट क्रॅश होईपर्यंत मोठय़ा प्रमाणात रिक्वेस्ट पाठवून सर्व्हर ऑफलाइन करण्यासाठी डिझाइन केले गेले आहेत.
अत्याधुनिक ‘वायपर’ चा हल्ला
इसेट आणि सिमेंटिक ह्या कंपनीच्या सायबर-सुरक्षा तज्ञांनी नंतर सांगितले की त्यांनी अत्याधुनिक ‘वाइपर’ हा मालवेअर वापरून संगणक प्रणालीवर हल्ला करण्याचा दुसरा प्रकार सुरु करुन देशातील शेकडो मशीनवर मालवेअर संक्रमित केला आहे. तसेच ह्या मालवेअरचा टाईमस्टॅप (वेळ व तारिख) हा डिसेंबर 2021 असा दाखवत आहे. ह्याचाच अर्थ की हा हल्ला पूर्व नियोजित असावा.
रशियाने ज्याप्रकारे युपेनवर हे सायबर हल्ले केले व संगणक बंद पाडण्याचा प्रयत्न केला तसे युक्रेनने देखील ह्याची दखल घेऊन बंद संगणक (सर्व्हर) लगेच कसे सुरु करता येईल याकडे भर दिला. तसेच युपेनमधील एक हॅकर्सच्या एका ग्रुपने हे हल्ले परतवण्यासाठी देखील कंबर कसली आहे.
ह्या सुरू असलेल्या रशिया युक्रेन सायबर युद्धात एक नवीन खेळाडू आहे अनॅनोमस हॅकर ग्रुप, हा युपेनच्या बाजूने उभा राहिला आहे. ह्या ग्रुपच्या ट्विटर हॅन्डलवरुन 27 फेब्रुवारी स. 9.42वा एक व्हिडिओस्वरुपामध्ये मेसेज दिला गेला की, तुम्ही युपेनवर युध्द लादले आहे. ह्याचा परिणाम रशियाला सायबर हल्ल्याच्या रुपाने भोगावा लागणार आहे व आम्ही रशियन सरकारच्या विरोधात ‘सायबर युद्ध’ सुरु केले आहे. याप्रमाणे रशियातील विविध सर्व्हर्स, सरकारी वेबसाईट भाविष्यात हॅक करुन गंभीर परिणाम सोसावा लागणार आहे आणि म्हटल्याप्रमाणे अनॅनोमस हॅकर्सनी अनेक रशियन सरकारी वेबसाइट्स आणि आरटी डॉट कॉम ही सरकारी-नियंत्रित टेलिव्हिजन नेटवर्कची वेबसाइट हॅक केली असल्याचा दावा केला आहे. काही वेबसाइट्स डाऊन केल्या गेल्या तर काही सर्व्हरवरील डेटा डीलीट केला गेला यामध्ये रशियन सरकार, पेमलिन, डय़ूमा आणि संरक्षण मंत्रालयाचा समावेश आहे. R.com व्यतिरिक्त, हॅकर कलेक्टिव्हने रशियन इंटरनेट सेवा पुरवठादार Com2Com, Relcom, Sovam Teleport आणि PTT-Teleport मॉस्को यांच्या वेबसाइटवर डिस्ट्रिब्य़टेड डिनायल ऑफ सर्व्हिस हल्ले सुरू केले. इन्होवेशन एम्पायरच्या दि 28 फेब्रु च्या ट्विटनुसार ह्या ग्रुपने 300 रशियन सरकार, राज्य माध्यमे आणि बँक यांच्या वेबसाइट्स हॅक केल्याचा दावा केला आहे.
थोडेसे मागे गेले तर हे सायबर युद्ध आज सुरु झाले नसून 2013 सालापासून रशियाने युपेनवर सायबर हल्ले केले आहेत. यामध्ये 2013साली ऑपरेशन ‘आर्मगेडॉन’, फेब्रुवारी 2014 ला ऑपरेशन ‘स्नेक’, युपेनची निवडणूक स्वयंचलित प्रणालीवर जून 2014साली हल्ला केला. युपेनच्या पॉवर ग्रिड हॅक केला डिसेंबर 2015साली. यामध्ये युक्रेनमधील ऊर्जा कंपन्यांवर ‘ब्लॅक एनर्जी’ हा ट्रोजन व्हायरस वापरून हल्ले केले. ही ऊर्जाकंपनी कीव, इव्हानो-फ्रँकिव्हस्क आणि चेर्निव्हत्सी प्रदेशांना ऊर्जा पुरवतात. तसे पाहिले गेले तर पॉवर ग्रिडवर हा पहिला यशस्वी सायबर हल्ला होता. युपेन पॉवर ग्रिड हॅक, डिसेंबर 2016 साली दुसरा हल्ला केला. युक्रेनच्या स्टेट टेजरीवर डिसेंबर 2016 साली केला तर 2017साली सर्वात मोठा petya virus चा हल्ला केला. जानेवारी 2022, नाटोमध्ये युपेनच्या भविष्यावर यूएस-रशियन वाटाघाटी अयशस्वी झाल्याच्या एक दिवसानंतर युपेनच्या सरकारी वेबसाईट्वर हल्ले झाले. ह्यात एक गंमत आहे. दोन्ही देश एकमेकांवर सायबर हल्ले करत असले तरी दोन्ही सरकार एकमेकांवर सायबर हल्ल्याचा आरोप करत आहे व आपला सहभाग नाकारत आहेत.