प्रतिनिधी /बेळगाव
रसिक रंजन या सांस्कृतिक संस्थेतर्फे ख्यातनाम अभिनेते दिलीपकुमार यांच्या 100 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवार दि. 11 व रविवार दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता लोकमान्य रंगमंदिर येथे ‘ए मुहब्बत झिंदाबाद’ हा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.
दोन दिवसांच्या या कार्यक्रमात दिलीपकुमार यांच्या जन्मापासूनच इतिहास विशद करीत त्यांनी अभिनित केलेली अजरामर गीतेही सादर करण्यात येतील. ‘गोल्डन व्हाईस ऑफ बेळगाव’मधील यशस्वी कलाकार करा ओकेवरील ही गाणी सादर करतील. त्या सोबत चित्रपटातील चित्राअंशही प्रदर्शित केले जातील.
सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असला तरी प्रवेशिका आवश्यक आहेत. या प्रवेशिका लोकमान्य रंगमंदिर व गुरूवारपेठ येथील लोकमान्य सोसायटीच्या मुख्यालयात दि. 9 डिसेंबरपासून उपलब्ध होतील. प्रवेशिकेशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कोविडचे नियम सक्तीचे असून त्याचे काटेकोर पालन केले जाईल. कोविड लसींचे दोन डोस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार असून त्यासाठीचा दाखला असणे आवश्यक आहे.
मर्यादीत आसन व्यवस्था असल्याने रसिकांनी त्वरीत आपल्या प्रवेशपत्रिका प्राप्त करुन घ्याव्यात.हा कार्यक्रम 3 तास 20 मिनीटीचा व दुसऱया दिवशीचा कार्यक्रम 3 तास 40 मिनीटाचा असेल याची रसिकांनी नोंद घ्यावी. सदर कार्यकम तरुण भारत युटय़ुब चॅनेलवरुन थेट प्रक्षेपित केला जाणार आहे.