वृत्तसंस्था/ कोलंबो
श्रीलंकेत पहिल्या प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेला आता एक आठवडा बाकी असताना विंडीजचा आंद्रे रसेल. दक्षिण आफ्रिकेचे डु प्लेसिस आणि डेव्हिड मिलर त्याचप्रमाणे डेव्हिड मलान यांनी माघार घेतली आहे.
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका खेळविले जाणार असल्याने दक्षिण अफ्रिकेच्या डु प्लेसिस, मिलर आणि मलान यांनी पहिल्या लंकन प्रिमियर लीग स्पर्धेसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे स्पर्धा आयोजकांना कळविले आहे. तर गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे विंडीजच्या रसेलने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज बिस्ला यानेही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेत ही स्पर्धा पहिल्यांदाच भरविली जात असून एकूण पाच संघांचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेतील सामने कँडी आणि हंबनटोटा येथील स्टेडियमवर खेळविले जातील. 15 दिवसांच्या कालावधीतील या स्पर्धेत एकूण 23 सामने होणार आहेत.