जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव शहरात एक तर तालुक्मयात कोरोनाचे दोन रूग्ण आढळल्यानंतर शहरातील बऱयाच गल्ल्यांमधून आणि तालुक्मयातील गावागावातील रस्ते बंद करण्यात आले होते. मोठे दगड, झाडाच्या फांद्या, मातीचे ढीगारे आदी मिळेल ते साहित्य लावून रस्ते अडविण्यात आले होते. मात्र असे प्रकार करणे शिक्षापात्र गुन्हा असून, नागरिकांनी रस्त्यावर लावण्यात आलेले सर्व अडथळे दुर करावेत आणि रस्ते मोकळे करावेत अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी केली आहे.
शुक्रवारी कॅम्प, बेळगुंदी व हिरेबागेवाडी येथील कोरोनाचे तीन रूग्ण पॉझिटीव्ह आढळल्याने जिल्हय़ात एकच खळबळ माजली होती. तर जिल्हा प्रशासनानेही यानंतर कॅम्प, बेळगुंदी आणि हिरेबागेवाडी हे प्रदेश निर्बंधित म्हणून घोषित करण्यात आले तर या भागासह शहरातील प्रमुख मार्ग आणि चौकातील रस्त्यांवर बॅरिकेड्स लावून रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र शहरातील अनेक गल्लीतील नागरिकांसह तालुक्मयातील जवळजवळ सर्व गावातील ग्रामस्थांनी गावच्या प्रवेशद्वारावर झाडाच्या मोठय़ा फांद्या, दगड, ओंडके, टायर, जुनी वाहने, बैलगाडय़ा, चित्ररथाची ट्रॉली आदीसह मिळेल ते साहित्य अडवे घालून रस्ते अडविले होते. यामुळे नागरीकांना जीवनावश्यक साहित्य आणण्यासाठीही मोठी समस्या निर्माण झाली होती. तर गॅस सिलिंडर, रेशन पुरवठा करणारी वाहने, रूग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक वस्तुंची ने-आण करणाऱया वाहनचालकांना मोठा त्रास जाणवला होता.
जिल्हाधिकाऱयांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, अशा पद्धतीने रस्ते अडविणे हा शिक्षापात्र गुन्हा आहे, यामुळे नागरिकांनी अडविण्यात आलेले सर्व मार्ग आणि रस्ते तात्काळ मोकळे करावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा रविवारी पत्रकाद्वारे दिला आहे. यामुळे रविवारी सायंकाळपर्यंत सर्व रस्ते जवळजवळ मोकळे झाले आहेत.