प्रतिनिधी/ मडगाव
रस्त्याच्या मधोमध ठेवलेली कार बाजुला काढ असे सांगणाऱया एका व्यक्तीवर खारेबांद -मडगाव येथे खुनी हल्ला झाला.
मडगाव पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार या खुनी हल्ल्याप्रकरणी फकीरबांद -मडगाव येथील आयुब सय्यद (26) व मूळ छत्तीसगढ राज्यातील व सध्या कालकोंडा- मडगाव येथील अनिलकुमार (37) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
या दोघांना न्यायालयापुढे उभे करण्यात आले तेव्हा न्यायालयाने त्यांना 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सविस्तर माहितीनुसार या खुनी हल्ल्याची घटना 11 जून रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला खारेबांद -मडगाव येथे घडली. या खुनी हल्ल्यात सेन्वी पिरीस हा 34 वर्षीय इसम गंभीररित्या जखमी झाला आहे.
एक कार रस्त्याच्या मधोमध उबी करण्यात आली होती आणि स्कुटरवरुन जात असलेल्या पिरीस यांनी सदर कार बाजुला ठेवा अशी विनंती केली. या एकाच कारणावरुन वरील दोन्ही हल्लेखोरांनी श्री. पिरीस यांच्या डोक्यावर लोखंडी सळी हाणली आणि पायावर कोयता मारला.
श्री. पिरीस सध्या जखमी स्थितीत सरकारी इस्पितळात उपचार घेत असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना 7 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.