प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेने या मोकाट जनावरांचा बंदोबस्त न केल्यामुळे शहरात मोकाट जनावरे फिरताना दिसत आहेत. काही ठिकाणी ती रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेली असतात. रविवारी संपूर्ण दिवस लॉकडाऊन असल्यामुळे शहरात वाहनांची वर्दळ कमी होती. यावेळी कॉलेज रोडवर मोकाट जनावरांचा कळप ठाण मांडून बसला होता. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात नागरिक घरात आणि मोकाट जनावरे रस्त्यावर असे चित्र पाहायला मिळाले.