सारथीनगर येथील युवकाचा प्रामाणिकपणा
प्रतिनिधी / बेळगाव
रस्त्यात सापडलेले पर्स सारथीनगर येथील एका युवकाने एपीएमसी पोलिसांच्या उपस्थितीत संबंधितांना परत केले आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे. युवकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यात येत आहे.
सारथीनगर येथील परशराम लोकाप्पा पुजेरी या युवकाला शाहूनगर येथे एक पर्स सापडली. या पार्समध्ये 2 हजार 340 रुपये रोख रक्कम, दोन एटीएम कार्ड, आरसीबुक, ड्रायव्हिंग लायसेन्स आदी होते. परशराम यांनी प्रामाणिकपणे आपल्याला सापडलेले पर्स एपीएमसी पोलीस स्थानकात जमा केले. आरसीबुकवरील पत्त्यावरून पार्वतीनगर, कंग्राळी खुर्द येथील कासीमसाब हुसेनसाब सौंदत्ती यांना पोलीस स्थानकात बोलावून त्यांचे पर्स परत करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री या अधिकाऱयांच्या उपस्थितीत संबंधितांना पर्स परत करण्यात आली.