पैंगीण ते पर्तगाळ भागातील प्रकार, अग्निशामक दलाने झाडे हटविली
प्रतिनिधी / काणकोण
मडगाव-कारवार मार्गावरील पर्तगाळ ते पैंगीण या भागात दोन ठिकाणी रस्त्याच्या बाजूची झाडे रस्त्यावर पडून रस्ता वाहतुकीला बंद होण्याची घटना 26 रोजी रात्री घडली. हा प्रकार साधारणपणे 8 च्या दरम्यान घडला. काणकोणच्या अग्निशामक दलाने दोन्ही ठिकाणी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला काढून रस्ता वाहतुकीला खुला केला. त्यापूर्वी गिमणे या भागात पडलेल्या झाडामुळे अडकून पडलेल्या वाहनांना वाट करून देण्यासाठी पैंगीणचे जागरूक नागरिक व्यंकटराय नाईक, संजीव तिळवे, गजानन पैंगीणकर, विशाल प्रभुदेसाई त्याचप्रमाणे वनरक्षक दिनेश कांदोळकर यांनी धाव घेतली.