प्रतिनिधी / विजापूर
रस्त्यावर थुंकणाऱया तीन अल्पवयीन मुलांना इंडी पोलिसांनी आज ताब्यात घेतले. इंडी शहरात भाजपचे माजी आमदार सार्वभौम बगली यांचे साई संतोष हॉस्पिटल आहे. आज याठिकाणी तीन अल्पवयीन मुले थुंकत आल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याविरोधात डॉ. संतोष बगली यांनी पोलिसात तक्रार केली. यावरून पोलिसांनी त्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालविली आहे.