कित्येक तास ठप्प राहिली वाहतूक
थायलंडमध्ये 100 हून अधिक माकडांच्या दोन गटांदरम्यान लढाईचा एक व्हिडिओ समारे आला आहे. व्हिडिओत माकडांचा एक मोठा समूह रस्त्यांवर परस्परांशी लढताना दिसून येत आहे. यादरम्यान रस्त्यावरून जाणारे लोक कित्येक तास एकाच ठिकाणी ताटकळत उभे होते.
या लढाईदरम्यान माकडांचा ओरडण्याचा आवाज मोठा असल्याने रस्त्यांवरील लोक घाबरले होते. ही घटना मध्य थायलंडमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लोपबुरी येथे घडली आहे. हे शहर जुन्या बौद्ध मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
पूर्ण घटना लोपबुरीमध्ये फ्रा कान मंदिर आणि प्रांग सॅम यॉटच्या आसपास घडली आहे. माकडांचे भांडण तासाहून अधिक वेळ चालले. यादरम्यान कार तसेच बाइक स्वार लोकांना आहे त्याच ठिकाणी उभे रहावे लागते. माकडांच्या या गँगवॉरमध्ये वाहतूक केंडी निर्माण झाली होती. माकडांचा एक समूह प्राचीन मंदिरात राहतो. दुसरा समूह बंद पडलेल्या चित्रपटगृहात तळ ठोकून आहे. पहिल्यांदाच मोठय़ा संख्येत माकडांना भांडताना पाहिले गेले आहे.
लोपबुरीच्या या पर्यटनस्थळावर मोठय़ा संख्येत माकडांचे वास्तव्य आहे. येथे येणाऱया पर्यटकांमुळेच या माकडांचे पोट भरते. पण कोरोना काळात देशभरात लॉकडाउन लागू असल्याने पर्यटकांचे येणे थांबले आहे. लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे स्थानिक लोकांच्या रोजगारावर गदा येण्यासह माकडांसमोर पोट भरण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.