कृति सेनॉन असणार मुख्य भूमिकेत
2001 साली प्रदर्शित ‘रहना है तेरे दिल में’ चित्रपट प्रेक्षकांचा खूपच भावला होता. आर. माधवन, दिया मिर्झा आणि सैफ अली खान यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली नसली तरीही टीव्हीवर दाखविण्यात आल्यावर तो लोकांच्या पसंतीस उतरला होता. मूळ चित्रपटाचे निर्माते वासु भगनानी यांचे पुत्र जॅकी या चित्रपटाचा सीक्वेल निर्माण करण्याच्या तयारीत आहेत.
माधवन, दिया मिर्झा आणि सैफ या तिघांना घेऊन 20 वर्षांनंतरची कथा दाखविण्याची योजना जॅकी यांची होती. पण माधव आणि सैफ तसेच दिया यांनी पुन्हा एकत्र काम करणे शक्य नसल्याचे कळविल्याने हा विचार सोडून द्यावा लागला आहे. याचमुळे चित्रपटाच्या सीक्वेलला नव्या कथेसह सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चित्रपटातील कलाकारांची निवड सुरू झाली असून सध्या कृति सेनॉन मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. नव्या चित्रपटाची कथा एक नायिका आणि दोन नायिकांच्या भोवती गुंफण्यात येणार आहे. नायकांची अद्याप निवड करण्यात आलेली नाही.
20 वर्षांपूर्वी याच चित्रपटाद्वारे आर. माधवन आणि दिया मिझां यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील स्वतःच्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. या चित्रपटानंतर दिया आणि माधवन कुठल्याच चित्रपटात एकत्र दिसून आलेले नाहीत.