प्रतिनिधी / पेठ वडगाव
सध्या संपूर्ण देशासह राज्यात कोरोना विषाणू साथीच्या आजारांने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची पालिका दवाखान्यात उपचारास गर्दी होत आहे. पालिकेच्या दवाखान्याकडे उपचारास येत असलेल्या गोरगरीब रूग्णांसाठी रहोबोथ सेवा संस्थेच्यावतीने मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांच्याकडे सर्दी, ताप, खोकला, कॅल्शियम व अन्य औषधे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी फार्मासिस्ट शशांक पाटील,प्रकाश पाटील, संस्थेचे अध्यक्ष प्रकाश भंडारे,दिपाली जगताप आणि जतीनराज जगताप उपस्थित होते. रहोबोथ संस्थेच्या वतीने विविध आपत्ती काळात पालिका प्रशासन, आपत्ती ग्रस्त नागरिक यांना नेहमीच मदतीचा हात दिला जातो. लॉक डाऊनच्या काळातही या सामाजिक संस्थेच्या वतीने प्रशासन व नागरिकांना विविध पातळीवर सहकार्य केले जात आहे. या मदतीबद्दल मुख्याधिकारी सुषमा शिंदे यांनी रहोबोथ सेवा संस्थेचे आभार व्य