वडगाव येथील कलाकार अजित औरवाडकरांनी रेखाटली रांगोळी
प्रतिनिधी/ बेळगाव
वडगाव येथील रांगोळी कलाकार व छायाचित्रकार अजित औरवाडकर यांनी रांगोळीतून विठुराया व वारकरी साकारला आहे. दोन बाय तीन फूट आकाराची ही रांगोळी तब्बल 11 तास मेहनत घेऊन त्यांनी रेखाटली. 15 जुलैपर्यंत सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत ज्योती फोटो स्टुडिओ नाझर कॅम्प, वडगाव येथे रांगोळी पाहता येणार आहे. वारकऱयांना विठुरायाच्या दर्शनाची लागलेली ओढ त्यांनी या रांगोळीतून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.