सचिन जगदेव यांनी केली भेंडीच्या नवीन वाणाची लागवड
मुबारक शेख / हुपरी
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील सचिन जगदेव या युवा शेतकऱ्याने थोड्या कालावधीत जादा उत्पन्न घेण्यासाठी नवीन जातीतील भेंडीच्या वाणाची लागवड करून जिह्यात प्रथमच लाल भेंडी बाजारात आणण्याचा यशस्वी प्रयोग राबविला आहे. भेंडीच्या या नवीन वाणाला बाजारातून मागणी वाढत आहे.
सचिन जगदेव यांनी सुरुवातीला भेंडीची 30 किलोची तोड घेऊन ती कोल्हापुरातील व्यापाऱयाकडे पाठविण्यात आली. कोल्हापूरकरांना प्रथमच लाल भेंडी खाण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या भेंडीची लागवड पश्चिम महाराष्ट्रामध्ये रांगोळी गावात पहिल्यांदाच जगदेव यांच्याकडून करण्यात आल्याने शेतकऱयांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जगदेव हे शेतामध्ये नेहमी पारंपरिक पद्धतीच्या पिकांचे उत्पादन घेत होते. त्यांना शेतामध्ये नवीन आधुनिक तंत्र वापरून नवीन पिकाचा प्रयोग करण्याची आवड असल्याने त्यांनी पिकाबाबत तज्ञांकडून आणि इंटरनेटवर माहिती घेतली. यातूनच त्यांनी आपल्या भागात लाल भेंडीची लागवड करण्याचा निर्णय घेतला.
लाल भेंडीची लागवड प्रामुख्याने पाश्चिमात्य देशात केली जात होती. काही प्रमाणात आपल्या देशामध्ये आयात केली जात होती. भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांनी 23 वर्षाच्या प्रयत्नानंतर लाल भेंडीचे वाण विकसित केले आहे. याला काशी लालीमा असे संबोधण्यात येते. याचे उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये मोठÎा प्रमाणात घेण्यात येते. महाराष्ट्रामध्ये गोल्डन सीडस् या कंपनीने या भेंडीला कुमकुम भेंडी असे नाव दिले आहे.
55 दिवसांपर्यंत चांगली मशागत
एक एकर खोडवा उस पिकामध्ये या भेंडीची लागवड केली. नियमित पिकांना देण्यात येणारी वेगवेगळी खते या भेंडीसाठी वापरण्यात आली. 55 दिवसांपर्यत चांगल्या पद्धतीने मशागत करून नवीन कोणत्याच खताचा वापर न करता भेंडीचे यशस्वी उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. प्रथम त्यांनी 30 किलोच्या भेंडीची तोड केली. इथून पुढे दोन महिने यातून उत्पन्न मिळणार असून प्रत्येक दोन दिवसातून एकदा ही तोड केली जाते.
लाल भेंडीच्या या वाणाला रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यामुळे कमी खर्चामध्ये चांगले पीक येते. तसेच या भेंडीचा उपयोग रक्तवाढीसाठी व शरीराच्या इम्युनिटी वाढविण्यासाठी गुणकारी आहे. त्यामुळे शेतकऱयांनी या भेंडीची लागवड केली तर त्यांना निश्चितच फायदा होईल. – सचिन जगदेव, रांगोळी