साहित्य : 1 वाटी मोड आलेले मूग, अर्धी वाटी तयार भात, 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट, 2 चमचे बारीक चिरलेली पुदिना, 1 चमचा लिंबूरस, चवीपुरते मीठ, तेल आवश्यकतेनुसार, सजावटीसाठीः अर्धा चमचा चाट मसाला, टोमॅटो केचप, ग्रीन चटणी
कृती : मोड आलेले मूग निवडून मिक्सरला लावून अगदी बारीक करून घ्यावे. आता बाऊलमध्ये काढावे. त्यात तयार भात, हिरवी मिरची पेस्ट, पुदिना, लिंबूरस आणि मीठ टाकून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर एकसमान टिक्की बनवून घ्यावी. आता गॅसच्या मंद आचेवर तवा गरम करून त्यावर तेलाचे थेंब टाकून पसरवावेत. नंतर त्यावर तयार मूग टिक्की ठेवून कडेने तेलाचे थेंब सोडून दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर परतवून घ्यावी. नंतर त्यावर चाट मसाला भुरभुरावा. आता तयार राईस टिक्की टोमॅटो केचप अथवा ग्रीन चटणीसोबत खाण्यास द्या.
टीप : टिक्कीसाठी भात मऊ बनवून घ्यावा.