विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा
वार्ताहर / केपे
केपे पालिकेत गेली तीन दशके आपला राजकीय दबदबा कायम ठेवलेले व काही वर्षांपूर्वी अवघ्या 150 च्या आसपास मतांनी विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी नगराध्यक्ष राऊल पेरेरा यांचा प्रभाग 10 यंदा अनुसुचित जातींतील महिलांकरिता राखीव झाल्याने ते पालिका निवडणूक लढवण्याची शक्मयता मावळली आहे. यामुळे कदाचित ते येणारी विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा केपेत सुरू झाली आहे. मात्र राऊल यांनी यासंबंधी कसलाच दुजोरा दिलेला नाही.
केपे पालिकेतील ज्येष्ठ नेते मानुएल कुलासो व पेरेरा यांचे प्रभाग राखीव करण्यात आले आहेत. यामुळे कुलासो यांनी दुसऱया प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पेरेरा हेही दुसऱया प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची चर्चा होती. मात्र बुधवारपर्यंत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. आज गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून बहुतेक ते आपली उमेदवारी दाखल करणार नसल्याचे दिसत आहे. याचा बदला ते येणाऱया विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करून घेतील अशी चर्चा केपेत आतापासून रंगली आहे. कुलासो व पेरेरा यांचा पालिकेत एकेकाळी बराच दबदबा होता. कुलासो हे आता काँग्रेसमध्ये सामील झाले असून ते केपे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष आहेत. तर पेरेरा हे उपमुख्यमंत्री चंद्रकात कवळेकर यांच्यासोबत होते. मात्र राखीवतेवरून ते नाराज झाले आहे. त्यामुळे ते विधानसभा निवडणूकीत उतरण्याची शक्मयता आहे. कवळेकर यांनी केपे पालिकेतील सत्ता पुन्हा काबिज केली, तर त्यांच्याकरिता पुढची विधानसभा निवडणूक सोपी जाईल, नाही तर बराच संघर्ष पाहायला मिळेल. कवळेकर यांना या सर्व गोष्टी माहिती असल्याने त्यांनी भाजपच्या जुन्या नेत्यांशी जवळीक साधली आहे. परंतु ते किती साथ देतात हे पाहावे लागेल.