तरीदेखील शहराला पाणीटंचाई भासणार नसल्याचे अधिकाऱयांचे म्हणणे
प्रतिनिधी / बेळगाव
शहराला पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत यंदा साडेतीन फुटाने घट झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्याने पाणीटंचाई निर्माण होणार का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. मात्र हिडकल जलाशयातून सहा एमजीडी पाणी जादा येत असल्याने उन्हाळय़ात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, अशी माहिती पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
राकसकोप जलाशयामधून शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वषी मुबलक पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईची समस्या भेडसावली नाही. मे अखेरपर्यंत शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला. मागील वषी दि. 15 जानेवारी 2020 रोजी 2474.10 फूट पाणीसाठा शिल्लक होता. मात्र यंदा 2470.80 फूट इतका पाणीसाठा राकसकोप जलाशयात शिल्लक आहे. मागील वषीच्या तुलनेत साडेतीन फूट पाणीसाठा कमी आहे. साडेतीन फूट पाणीसाठा शहराला एक महिना होवू शकतो. मात्र इतका पाणीसाठा कमी असल्याने पाणी टंचाईची समस्या भेडसावण्याची शक्मयता व्यक्त करण्यात येत आहे.
दरवषी जून अखेरपर्यंत पाणीसाठा पुरतो. पाऊस लांबणीवर पडल्यास डेडस्टोरेजमधील पाणीसाठा उपसा करून शहरवासियांना पुरविण्यात येतो. मागील वषी मुबलक पाणीसाठा असल्याने मे अखेरपर्यंत शहरवासियांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला होता. यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे राकसकोप जलाशयातील पाणीसाठा जून अखेरपर्यंत पुरेल, अशी अपेक्षा होती. पण पाणीसाठा साडेतीन फुटाने कमी आहे.
हिडकल जलाशयामधून दररोज 18 एमजीडी पाणी उपसा
दिवाळीदरम्यान हिडकलमधून होणारा पाणी पुरवठा बंद होता. हिडकल जलाशयामधून जादा पाणी उपसा करण्यासाठी विद्युत पंपाची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे हिडकल जलाशयामधून शहराला करण्यात येणारा पाणी पुरवठा वीस दिवस बंद होता. त्यादरम्यान पाणी पुरवठय़ाचा ताण राकसकोप पाणी पुरवठा योजनेवर वाढला होता. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी राकसकोप जलाशयातून पाणी उपसा जास्त करण्यात आला होता. त्यामुळे राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळीत घट झाली आहे. पण पाणी पातळी कमी असली तरी उन्हाळय़ात टंचाई भासणार नाही, अशी माहिती पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी दिली. हिडकल जलाशयामधून दररोज 9 ते 10 एमजीडी पाणी उपसा करण्यात येत होता. मात्र विद्युतपंपाची क्षमता वाढविण्यात आल्याने दररोज 18 एमजीडी पाणी उपसा करण्यात येत आहे. तसेच हिडकल जलाशयात बेळगाव शहरासाठी 1.5 टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवला जातो. त्यामुळे राकसकोप जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्यास हिडकल जलाशयामधून शहराला पाणी पुरवठा करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली.