प्रतिनिधी/ सातारा
यंदा कोरोना वायरसचा रक्षाबंधन सणाला चांगलाच फटका बसला आहे. दरवर्षी शहरात मोठय़ा प्रमाणावर राखीचे स्टाँल विक्रेते उभे करतात. मात्र सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करत एसटी स्टँड परिसर, राजवाडा येथे काहीच स्टाँल उभारणीला सुरुवात झाली आहे.
राखी पौर्णिमा म्हणजे ’रक्षाबंधन’ हा सण बहीण भावाच्या अतुट, उत्कट प्रेमाची आठवण करुन देणारा दिवस. यंदा हा सण 3 आँगस्टला साजरी होणार आहे. रक्षाबंधन सणाच्या आठ दिवस आधी शहरातील बाजारपेठेत राखी विक्रीला येते. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमी लाँकडाऊन लागू असून जिल्हातर्गंत वाहतूक बंद आहे. यामुळे विक्रेत्यांना वेगवेगळ्या, आकर्षक आशा राख्या विक्रीसाठी आणता आलेल्या नाहीत. तसेच 9 ते 2 यावेळेत खरेदीला परवानगी आहे. फक्त 7 दिवसावर आलेल्या या सणासाठी शहरातील एसटी स्टँड परिसरात स्टाँल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. फक्त दोन स्टाँल उभारुन यामध्ये अंतर ठेवण्यात आले आहे. यासह राजवाडा परिसरात हातगाडय़ावर, छत्रीत राखी विक्री होणार आहे. खरेदी करताना सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.