प्रतिनिधी / सांगली
शहरातील सांगली-मिरज रोडवरील क्रांती भोजनालयाजवळ असणाऱ्या देशी दारूच्या दुकानाजवळ एकाच्या डोक्यात सोडा वॉटरची बाटली फोडली आहे. यामध्ये धुळाप्पा इराण्णा मिनगीरीकर वय 52 रा. वानलेस चेस्ट हॉस्पिटल हे जखमी झाले आहेत. याबाबत एकाविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत हकीकत अशी की, फिर्यादी धुळाप्पा मिनगीरीकर आणि त्याचा एक मित्र क्रांती भोजनालयाजवळ असणाऱ्या देशी दारूच्या दुकानाजवळ गप्पा मारत होते. त्याचवेळी संशयित स्वप्नील देवकुळे रा. बेथेलहेम नगर हा त्या दोघांजवळ आला आणि त्यांने तुम्ही माझ्याबद्दल उलटसुलट बोलत आहे असे म्हणत रागाने जवळील सोडा वॉटरची बाटली धुळाप्पा यांच्या डोक्यात फोडली. जखमी धुळाप्पा यांच्यावर वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत देवकुळे याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.