साहित्यः
अर्धी वाटी रागी पीठ, पाव वाटी ओट्स पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे तेल, अर्धा हिरवी मिरची पेस्ट, अर्धा चमचा लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ
कृतीः
बाऊलमध्ये रागी पीठ चाळणीने चाळून घ्यावे. नंतर त्यात चाळणीने चाळलेले गव्हाचे पीठ आणि ओट्स घालून मिश्रण मिक्स करावे. आता त्यात हिरवी मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, तेल आणि मीठ घालून परत एकदा साहित्य मिक्स करावे. आता आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी घालून त्याचा गोळा मळून पंधरा मिनिटे ठेवावा. नंतर गोळा परत एकदा मळून त्याचे दोन भाग करावेत. आता पोळपाटावर कोरडे पीठ पसरवून त्यावर गोळा चपातीप्रमाणे लाटून घ्यावा. चमचाच्या सहाय्याने त्यावर टोचावे. नंतर सुरीच्या सहाय्याने त्याचे चौकोन अथवा हव्या त्या आकारात तुकडे करावेत. तुपाचा हात लावलेल्या ट्रेवर तुकडे ठेवावेत. आता ओव्हन 180 डिग्रीवर प्रिहीट करून 25 ते 30 मिनिटे ट्रे ठेवून बेक करावेत. आणखी क्रिस्पी हवे असल्यास रागी तुकडय़ाची बाजू पलटून ट्रे आणखी 12 मिनिटे ओव्हनमध्ये ठेवून बेक करावे. आता तयार रागी क्रॅकर्स चहासोबत खाण्यास द्या.