साहित्य : 1 वाटी रागीपीठ, 1 चमचा सोयापीठ, 1 चमचा तीळ, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, 1 चमचा किसलेलं आलं, पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, तेल आवश्यकतेनुसार
कृती : बाऊलमध्ये रागी पीठ चाळणीने चाळून घ्यावे. नंतर त्यात सोया पीठ, तीळ, कांदा, हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर आणि मीठ घालून मिश्रण मिक्स करून घ्यावे. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याचा मध्यमसर गोळा मळून घ्यावा. नंतर त्याचे एकसमान गोळे करावेत. आता गॅसच्या मध्यम आचेवर तवा गरम करावा. त्यावर तेलाचे काही थेंब टाकून पसरवून घ्यावे. आता आच मंद करून त्यावर रागी पीठाचा एक गोळा ठेवून बोटांच्या सहाय्याने थालीपीठ थापतो तसे गोलाकार थापावे. कडेने तेलाचे थेंब सोडून पॅनकेक दोन्ही बाजूने हलक्या सोनेरी रंगावर भाजावे. आता तयार रागी पॅनकेक गाजर-गार्लिक चटणीसोबत खाण्यास द्या.