उत्तरप्रदेशमध्ये काही वर्षांपासून एक अभिनव शैक्षणिक प्रयोग सुरू आहे. राजकीय नेते तयार करण्यासाठी येथे राजकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. राज्यातील फैजाबाद जिल्हय़ात हे महाविद्यालय आहे. उत्तर प्रदेशच्या मानवबळ विकास विभागाने ते सुरू केले आहे. या महाविद्यालयात राजकारणासंबंधीचा अभ्यासक्रम शिकविला जातो. भारताची राज्य घटना, महत्त्वाचे विविध कायदे, संसदीय कार्यप्रणाली, निवडणुका व त्याविषयीचे नियम, राजकीय आचारसंहिता, आदी माहिती व ज्ञान या महविद्यालयात दिले जाते. ज्यांना राजकारणात यायचे आहे त्यांची ‘राजकीय साक्षरता’ वाढावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यंदा कोरोनामुळे या महाविद्यालयात प्रवेश परीक्षेविनाच प्रवेश देण्याची योजना आहे. तसेच शिक्षणही विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात न बोलाविता ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी यंदा ऑनलाईन प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यासाठीचा अर्जही ऑनलाईन भरावयाचा आहे. अर्जांची छाननी करण्याचे काम अशाच प्रकारे करण्यात येणार असून गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश निश्चित केला जाणार आहे.
Previous Articleआजचे भविष्य शनिवार दि. 1 मे 2021
Next Article मँचेस्टर युनायटेडकडून रोमा पराभूत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.