वार्ताहर / मालवण:
मच्छीमारांना हवामानविषयक माहिती देणारा मालवण-राजकोट भागातील वादळी हवामानसूचक स्तंभ गेल्या सहा महिन्यांपासून तुटला आहे. सोमवारी चक्रीवादळाचा सतर्कतेचा इशारा देणारा बावटाच बंदर विभागाला या स्तंभावर लावता आला नसल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांनी केला आहे. मालवणच्या बंदर विभागाने सावंतवाडी येथील सागरी अभियंता कार्यालयाला स्तंभ दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार करूनही त्यांनी कोणतीही दखल घेतली नसल्याने मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मनसे तालुका अध्यक्ष विनोद सांडव, मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, विनायक गावडे, गुरु तोडणकर, भारती वाघ, विशाल ओटवणेकर आदी उपस्थित होते.
मनसेने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, समुद्रात जाणाऱया मच्छीमारांसाठी हवामान कशा पद्धतीचे आहे, याची माहिती देणारा हवामान सूचक स्तंभ मालवण राजकोट भागातील एका खडकावर कित्येक वर्षांपूर्वी उभारण्यात आला आहे. हा लोखंडी स्तंभ वादळी हवामानामुळे आणि पावसामुळे जीर्ण झाला आहे. सुमारे 30 ते 35 फूट उंचीचा हा स्तंभ सहा महिन्यांपूर्वी कोलमडलेल्या स्थितीत मालवणच्या बंदर विभागाला आढळून आला. मालवण बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांनी या स्तंभाची दुरुस्ती व्हावी, यादृष्टीने वरि÷ांकडे पत्रव्यवहार केला. तसेच सावंतवाडीच्या सागरी अभियंता कार्यालयालाही या स्तंभाच्या दुरुस्तीविषयी कळविण्यात आले. मालवण बंदर विभागाने वेळोवेळी कळविल्यानंतर बंदर विभागाच्या अधिकाऱयांनी सागरी अभियंता कार्यालयाच्या अधिकाऱयांबरोबर या स्तंभाची पाहणी केली. मात्र, या पाहणीला आता सहा महिने उलटून गेले, तरी अद्याप दुरुस्ती झालेली नाही.
बावटा लागलाच नाही
मालवण राजकोट भागात असणारा हा हवामान सूचक स्तंभ कलंडलेल्या स्थितीत आहे. रविवारपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळाची शक्मयता वर्तविण्यात येत होती. सोमवारी हवामान विभागाने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात यावा, असे कळविले होते. मात्र, राजकोट भागातील हा स्तंभ कलंडलेल्या स्थितीत असल्याने हा बावटा बंदर विभागाने लावला नाही. याबाबत मालवण बंदर विभागाच्या बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी स्तंभ कलंडलेला असल्याने बावटा लावणे धोक्मयाचे आहे. त्यामुळे स्तंभावर बावटा लावला नाही, तरी कार्यालयाजवळ फलकावर तीन नंबर बावटय़ाची माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले.