प्रतिनिधी/ सातारा
मराठय़ांची राजधानी असणाऱया शाहूनगरीत तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने सकाळी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयात दुग्धाभिषेक करुन अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिथीनुसार शिवराज्यभिषेक दिन सोहळा अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावेळी शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे जयंत देशपांडे, हिंदूस्थान प्रतिष्ठानचे सतीश बापू ओतारी, राजू गोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे शिवराज्यभिषेक दिन. 348 वा शिवराज्यभिषेक दिन असून बाकीचे आपण सण करत असू पण हाही आपल्यासाठी एक सण आहे. ज्यांच्यामुळे आपल्याला सण, उत्सव साजरे करता येतात ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्यभिषेक दिन आहे. त्यानिमित्ताने मी त्यांना वंदन करते. दरम्यान, शिवराज्याभिषेकाचे औचित्य साधत समितीच्यावतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित शिबिरात अनेकांनी रक्तदान करुन आपला सहभाग दाखव