प्रतिनिधी / पणजी
राजधानीत सोमवारी नवे 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील एकाचा पत्ता सापडत नाही आहे. पत्त्यामध्ये त्या माणसाने उत्तर गोवा, पणजी एवढाच पत्ता नमुद केला आहे. अशी माहीती महापौर उदय मडकईकर यांनी दिली. सोमवारी मिळालेल्या रुग्णापैकी भाटले येथील साईबाब मंदिरजवळ 1, सांतईनेझ येथील करीम इमारतीत व कामत हार्मोनी या इमारतीत प्रत्येकी 1, दोनापावला येथील ला मार्वेल कॉलनी येथे 2, आल्तीनो येथील सरकारी वसाहतीत 1, रायबंदर येथे 1, बॉक-द-वॉक येथे 1, व मिलीटरी हॉस्पिटल येथे 3 कोरोना रुग्ण सापडले आहेत. उदय मडकईकर यांनी अधिक माहीती देताना सांगितले. वरील सर्व ठिकाणे त्वरीत सॅनिटायझ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.